नात्यातला झगडगुंता.... (Emotional Complications)
रूमवर आल्यावर बघितले तर प्रियाचा चेहरा काहीसा उदास होता. मला बघितल्यावर तर तिला रडूच कोसळले. काय झाले विचारले तर तिने मला तिच्या bf चा मेल दाखवला. ब्रेकअप म्हणून... खूप समजावल्यावर तिचे रडणे कसे-बसे थांबले. कॉलेजचे ते मस्त स्वच्छंदी बागडण्याचे दिवस ! ते वेडे वय असतेच तसे. कधी आखोही-आखोंमे इशारा होतो नि केळ्याच्या सालावरून घसरून पडावे तसे आम्ही प्रेमात पडतो. कॉलेजातल्या ' केमिस्ट्रीच्या लेक्चरला वेगळीच केमिस्ट्री जमू लागते. ' अजिब दास्ता है ये....' असं म्हणता म्हणता ती अजिब वाटणारी दास्ता नकळतच कधी आपली होऊन जाते हे समजतच नाही. मग काय हवायेन चलने लगती है,अगदी स्लो मोशन मध्ये दुपट्टा सुधा उडायला लागतो बर का ! रात्र-रात्र जागून एकमेकांशी तासनतास फोनवर बोलणे सुरु होत.. बाईकवरून सुसाट लॉंग-ड्राईव्ह होतात... भर थंडीत आईस्क्रीम खाण्यात मज्जा यायला लागते.. हॉटेलात गेल्यावर, " सांग ना, तुला आवडेल ते मला ' काहीही ' चालेल " असं म्हणत मेन्यू ठरवण्यात अर्धा-अर्धा तास जायला लागतो.. त्यावरून लटकी भांडण, रुसवेफुगवेही सुरु होतात..
काही दिवसातच मग रोजच्या रोज ठरल्यावेळेस फोन झालाच पाहिजे. काय खाल्ल, काय प्याल, किती वाजता झोपेतून उठलात याचं reporting कम्पलसरी होऊ लागत.आता तर व्होट्सपला सगळे म्हणजे सगळे शेअर होते.या नव्या टेक्नोलॉजीमुळे ते मनाने एकत्रच जगायला लागतात.कुठ गेलात,काय केलं, कुठले पदार्थ खाल्ले, कुठला ड्रेस घातला,कोण मित्र-मैत्रिणी बरोबर होते हे सार शेअर व्हायला लागत. एकमेकांचा मिनीट टू मिनीट प्रोग्राम शेअर व्हायला लागतो. त्याच्याशिवाय न जेवणे, एकमेकांसाठीची वाट बघणे, सुखावह वाटते. सुरुवातीला उत्साहानं हे सार शेअर केलं जात, सांग ना काय करू चे हट्ट होतात, तू म्हणतोस/म्हणतेस तेच करते/करतो असं म्हणत कायपण केलंही जात.
आणि मग काही दिवसातच नवी-नवलाई सरली की रोमेओ चा हिटलर होतो मग तू 'त्याच्या'कडे बघूनच का हसलीस, तू 'त्याच्या'शी का बोलतेस, मग तू असाच ड्रेस का घातलास यावरून तो बोलायला लागतो.अत्यंत लाडात वाढलेल्या तिला असे काही ऐकण्याची सवय नसते मग ती आपले ' ब्रह्मास्त्र ' काढते नि परत त्यालाच माघार घ्यावी लागते. हळूहळू का होईना एकमेकांना अडजस्ट करत प्रेमाची गाडी पुढे चालू लागते.
ती असते काहीशी स्वप्नानच्या दुनियेत उडणारी. इतिहास,साहित्य, कथा-कादमबर्यानमध्ये रमणारी अशी. नेहमी नवे काहीतरी शोधणारी. काहीशी इमोशनल,छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी अशी साधी मुलगी तर तो फुटबॉलचा fan. ब्रान्देड कपडे, विडीओ गेम्स आणि नवीन मोबाइलस,कारचा शौकीन. जसजसे दिवस जाऊ लागतात तसतसे दोघांना एकमेकांची आवड-निवड समजू लागते. आणि स्वप्नलहरींवर झुलणार मनाच तारू वास्तवांच्या खडकावर फुटून हादरे बसायला लागतात....
प्रेमळ-रोमांटीक संवाद आणि ' तुझ्यासाठी कायपण ' ऐवजी तुसडी उत्तरं सुरु होतात... व्होट्सपच्या शेअरिंगमुळे मात्र काही दिवसातच आपल्याला एका मिनटाचेही स्वातंत्र्य नाही म्हणत भांडण व्हायला लागतात.मग कधी त्याच्या ऑफिसच्या frustration मुले तिचा पारा चढतो नि तिचे अभ्यासात मन लागत नाही तर कामामुळे वैतागलेला तो आधी गोड वाटणाऱ्या तिच्या गोष्टी त्याला कंटाळवाण्या वाटू लागतात.ठरल्यावेळेस फोन करण्याचे आग्रह, फोन न उचलला गेल्यास चिडचिड, वेटिंगवर राहिल्यास उलटतपासणी असे सगळे प्रकार सर्रास होतात.अगदी एकमेकांचे मेल पासवर्ड मागण्याच्या हट्टापर्यंत.!!
आपण गुंतत चाललो आहे हे कळत असतानाच पझेसिव्हनेस नात्याला विळखाही घालायला लागतो.. कोण कुणाला डोमिनेट करतो याचे खल सुरु होतात आणि वाटू लागत, आपला निर्णय चुकला तर नाही ना..? मग माझ्या बोलण्याने तो दुखावणार तर नाही ना, त्याला काय वाटेल असं म्हणून बऱ्याच गोष्टी मनातच राहू लागतात. आधीचा हलकाफुलका संवाद नाहीसा होतो. एकमेकांना सांगण्याची काय ही सक्ती..! असं वाटून रंगीबेरंगी दिवसांवर पाणी पडू लागते.
आणि मग आपली प्रेमाची गाडी गचके खायला लागते. हे कमीच की काय दोघांना त्यांच्या करिअरचे tensions असतातच.तिचे कॉलेजचे इव्हेनट आणि त्याचे ऑफिसमधले टार्गेट्स. दोघांची ' करा नाहीतर मरा ' अशीच अवस्था असते दोन्हीकडे. त्यात जर दोघांमध्येच जर सुसंवाद नसेल तर घरातल्यांना समजावून कोण सांगणार असे वाटू लागते. मग कोणा एकाच्या तोंडून शेवटी ब्रेक घेऊयात असा शब्द ओघाने का होईना बाहेर पडतो. एकमेकांच्या नात्याची गाठ कधी उसवते कळत नाही.
यासाठी काही गोष्टी दोघांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपल्या पार्टनरला अपेक्षांच्या ओझ्याखाली दबू देऊ नका. आपण भावनिकदृष्ट स्वतःला किती ओळखतो, आपली आवड-निवड, राहणीमान नि विचार काय आहेत नि आपल्या पार्टनर कडून आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजणेही महत्वाचे आहे. अगदीच मुंबई-पुणे-मुंबई मधल्या स्वप्नीलच्याच शब्दात सांगायचे झाले तर - ' दोघांमध्ये असणाऱ्या नात्याला फुलायला वेळ दया.हळूहळू एकमेकांची सवय होऊ दया. एकमेकांना स्पेस देत स्वतःचे अस्तित्व निर्माण करा ' मग तुमचे नाते बहरेल. प्रेमाबरोबरच एकमेकांबद्दल आदर-विश्वास आणि संवाद असायलाच हवा नाही का..?
Comments
Post a Comment