तूच तू...
"तूच तू..."
सुखाचा "स्पर्श" तू.. माझा गुंतलेला श्वास तू..
आयुष्य रंगवून टाकणारा अनामिक रंग तू..
मी अंतर्मनात जपलेला षड्ज तू..
मला विरघळवून टाकणारा माझा शिंपला तू..
माझ्या प्रत्येक श्वासात झिरपणारा थेंब तू..
कोणती जादू ही, माझे मलाच उमजेना..!
आणि माझ्यात माझ्यापेक्षा जास्त होणारा तू..
तुझा गंध माझा, तुझा रंग माझा, स्पर्श माझा...
श्वासही तू माझाच, ती धुंद मिठी ही माझीच...
माझे म्हणायला माझे आहे तरी काय..
kamal likhte ho yaar aap...
ReplyDelete