नात्यातला झगडगुंता.... (Emotional Complications)

रूमवर आल्यावर बघितले तर प्रियाचा चेहरा काहीसा उदास होता. मला बघितल्यावर तर तिला रडूच कोसळले. काय झाले विचारले तर तिने मला तिच्या bf चा मेल दाखवला. ब्रेकअप म्हणून... खूप समजावल्यावर तिचे रडणे कसे-बसे थांबले. कॉलेजचे ते मस्त स्वच्छंदी बागडण्याचे दिवस ! ते वेडे वय असतेच तसे. कधी आखोही-आखोंमे इशारा होतो नि केळ्याच्या सालावरून घसरून पडावे तसे आम्ही प्रेमात पडतो. कॉलेजातल्या ' केमिस्ट्रीच्या लेक्चरला वेगळीच केमिस्ट्री जमू लागते. ' अजिब दास्ता है ये....' असं म्हणता म्हणता ती अजिब वाटणारी दास्ता नकळतच कधी आपली होऊन जाते हे समजतच नाही. मग काय हवायेन चलने लगती है,अगदी स्लो मोशन मध्ये दुपट्टा सुधा उडायला लागतो बर का ! रात्र-रात्र जागून एकमेकांशी तासनतास फोनवर बोलणे सुरु होत.. बाईकवरून सुसाट लॉंग-ड्राईव्ह होतात... भर थंडीत आईस्क्रीम खाण्यात मज्जा यायला लागते.. हॉटेलात गेल्यावर, " सांग ना, तुला आवडेल ते मला ' काहीही ' चालेल " असं म्हणत मेन्यू ठरवण्यात अर्धा-अर्धा तास जायला लागतो.. त्यावरून लटकी भांडण, रुसवेफुगवेही सुरु होतात.. ...