TTMM.. तुझं तू .. माझं मी...

                      celebration करायला काही कारण लागते का..! निमित्त होते मित्राची अविष्कार प्रकल्प स्पर्धेमध्ये निवड झाल्याचे. ' party तो बनती है बॉस ' असं म्हणत सगळ्यांनीच त्याला party मागितली. आमचा कट्टा, हक्काचे नेहमीचे ठिकाण-' ममता '. ममताचा सामोसा आणि दुर्गा मधली कॉफी. आम्ही पंधरा-वीस जण मित्र-मैत्रिणी सगळे. सगळेच batchelor, कॉलेज करणारे विद्यार्थी. त्यामुळे एका मित्रावर सगळ्यांचा खर्च नको म्हणून प्रत्येकाने स्वतःचे पैसे दिले. खूप चं वाटले. सगळे एकत्र जमले आणि त्याच्या आनंदात सहभागी झाले. पण एकट्याला खर्चात पाडायला नको म्हणून स्वतः contribution करून celebration करणारे मित्र-मैत्रिणी ! समजूतदारपणा, समयसूचकता शिकवणारी कॉलेज लाईफ मधली मस्ती.

                       कधी परीक्षा संपली म्हणून तर कधी मित्राने नवीन mobile घेतला म्हणून! किंवा एखाद्या स्पर्धेतल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल केलेली छोटीसी party. मित्राचा वाढदिवस साजरा करायचा असला तरी तिला किंवा त्याला खर्चात टाकणार नाहीत. कोणीच कमवते नाहीये, सगळ्यांची परिस्थिती सारखीच आहे हे समजून घेण्याचे शहाणपण देऊन जाते हे TTMM. खिशात पैसे नसले तरी एक पावभाजी नि बारा पावांची एक लादी दहा मित्रांमध्ये खाण्यातली मजा औरच.! कॉलेज सुटल्यावर चार मित्रांमध्ये मागवलेला cutting चहा आणि गप्पा-टप्पांची रेलचेल यासारखा भन्नाट अनुभव नि स्वर्गसुख न अनुभवलेला विरळच. माझी दोस्ती-यारी म्हणत, एकमेकांना समजून घेत तू तुझे पैसे दे, मी माझे पैसे देईन म्हणणे एका दृष्टीने योग्य आहे पण नाण्याला दुसरी बाजू असते त्याप्रमाणे यात पण एक चुकीची गोष्ट आहे. कधीकधी याच TTMM च्या नादात दूरची लोक जवळ येतात पण जवळचे मित्र दुरावतात.

                      अरे, मी पैसे देतो- ' एवढंच ओळखलंस का राव, मला..' असं म्हणून एक सणसणीत शिवी हासडणारे जिवलग मित्र पण असतात, ' पैसे जास्त झालेत का तुला ', असं म्हणत आपले बिल पण तेच भरतात. आपल्यावर हक्क गाजवणारया या मित्रांना TTMM म्हणजे खूपच मोठा शिष्टाचार वाटतो. कधीकधी असे कटू प्रसंगही या TTMM मुले ओढावतात.

                      परवाचीच गोष्ट. मित्राची राज्यस्तरीय फुटबाल स्पर्धेसाठी निवड झाली म्हणून आम्ही ' वैशाली ' मध्ये गेलो. बिल देण्यासाठी पैसे बाहेर काढल्यावर तो मित्र भलताच संतापला. aआपल्यामध्ये हे शिष्टाचार कशाला हवेत. आपली यारी-दोस्ती विसरलास का म्हणत बऱ्याच शिव्या खाल्या. कुठेतरी त्याच्या भावनांना दुखावल्याचे जाणवले. शेवटी practical कधी, कुठे नि कुणाबरोबर राहायचे हे देखील आपल्याला समजायला हवे. पैश्यावर काय आपली मैत्री ठरणार आहे काय हे त्याचे वाक्य मनाला चटका लाऊन गेले आणि मला माझी चूक जाणवली. कुठेतरी दोघांमधल्या मैत्रीपूर्ण संबंधांना तडा जाऊ शकतो हे मी मनोमन समजून चुकले. आणि परत असा प्रसंग घडणार नाही याची खात्री पटवून दिल्यावर मगच तो मित्र शांत झाला. अशा प्रकारे एखाद्या मित्राला किंवा मैत्रीणीला बकरा बनवणारे मित्र पण पाहण्याचा अनुभव घेतलाय.

                      पण शेवटी आपण कोणत्या मित्राबरोबर कसे राहायचे हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न ! त्यामुळे मित्रांनो , TTMM हे समजूतदारपणे केलेलं celebration तर आहेच पण यामुळे आपल्या सच्या आणि जिवलग मित्रांमध्ये कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे कधीही उत्तमच!




Comments

Popular posts from this blog

तुझं माझं जमेना नि तुझ्यावाचून करमेना....

तूच तू...

प्रेमरंग तुझा बावरा....!