" ती एक संध्याकाळ..."
आज practical नसल्यामुळे लवकर आले कॉलेजमधून. फ्रेश झाले नि कानात earphone टाकून गाणी ऐकत नेहमीप्रमाणे खिडकीतून त्या पडणाऱ्या पावसाकडे खूप वेळ एकटीच बघत बसले होते.
खिडकीतून खाली येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांची, गाडयांची वर्दळ नेहमीचीच. आणि ती बघत बसणे हा माझा आवडता छंद. पण आज मला काहीतरी वेगळे जाणवत होते. पाऊस...!!! आज पाऊस पण होता यासगळ्या बरोबर. प्रत्येकाला भिजवत होता, गुंतवत होता स्वतःमध्ये. पण मी मात्र त्याच्याबरोबर आणखी कुणाशी तरी गुंतत होते. खूप खोल-खोल.....
मला ‘त्या’ ची आठवण येत होती. मी खिडकीशी बसलेले.. काहीशी उदास. एखादा मुरलेला कलाकार सतारीवर तारा छेडाव्या तसा एका पाठोपाठ एक, अनेक सरींवर सरी कोसळू लागल्या. mostly पाऊस पडल्यावर मी पेन घेते किंवा मग ब्रश घेऊन कॅन्व्हास कॅलरफुल करायचा असतो मला. पण आज चक्क पावसात चिंब भिजावेसे वाटत होते तुझ्याबरोबर..!!
मी सर्व बंधने झुगारून दिली नि स्वारगेटला आले. चौकशी केली तर सुदैवाने पंधरा मिनटात next शिवनेरी लागणार होती. मी आतुरतेने वाट बघत होते तिची, पंधरा मिनटे सरता-सरत नव्हती. नि मी बसमध्ये चढले, तुज्याकडे येण्यासाठी... बराच मोठ्ठा प्रवास पण खूपसा गमतीशीर ! नागमोडी वाट, कड्यांवरून पडणारे छोटे-छोटे धबधबे, लपाछपी करणारे बोगदे आणि हिरवी शाल पांघरलेला लोणावळा ! (या सगळ्यान बरोबर ‘ तू ’ होतास माज्याबरोबर..?) विरह म्हणजे काय..? व्याकुळता...? ती अनावर ओढ..... तुज्याकडे यायचे एवढेच फक्त मला माहीत होते......!! माझ्या बसने एक्सप्रेस हायवे सोडला नि फायनली मी ठाण्यात आले. तुझ्या ऑफिसखाली पोहोचले.
मी तुला call केला. “ हेलो, बोल ना ”, तुझा उत्तरासम प्रतिसाद. मी फक्त miss you बोलले. इतक्यात तुझा phone वाजला नि तू म्हाणलास एक पाच मिनटात तुला लगेच phone करतो... नि तू phone कट केलास.. मी पाच मिनटे संपण्याची नि तुझ्या phone ची वाट बघू लागले. आणि तुझा phone आला थोड्या वेळाने.... मी म्हटले, “ खूप आठवण येतेय रे तुझी, भेटशील का मला ? ” तू म्हटलास “ या वीकेंडला नक्की try करतो, मला पण खूप आठवण येतेय तुझी.. वैतागलोय रे खूप office आणि काम यामुळे पुरता अडकुन गेलोय... या sunday ला येतो जमले तर नक्की..” तू माझी वेडी समजूत काढत होतास. तुला ही माहीत होते दोघांना वेळ नाही मिळणार ते....! मी शांत होते आणि म्हणले, “ आत्ता भेटशील मला ? ” तू काहीसा confuse आणि शांत सुद्धा. “ भेटलो असतो गं, रोज आलो असतो भेटायला तुला... तू मुंबईत असतीस तर..! ” मी तुझे वाक्य मधेच तोडून बोलले आणि म्हणले- “ येतोस का आत्ता ; मी खाली उभी आहे.. तुझी वाट बघतेय. तू क्षणभर शांत नि म्हटलास, “ हो, येतो ना ! ” “ ok, मी थांबलेय खाली, किती वेळ भिजत थांबू, ये ना...” आता मात्र तू म्हणलास- “ Hey, गम्मत नको करूस हा ! खरे बोलतेस काय ! ” मी म्हटले, “ तू ये तर खाली आधी..”
तुला convince केल्यावर तू खाली आलास. तुला अजूनही विश्वास बसत नव्हता... आणि मला सुद्धा तू समोर आहेस असा वाटत नव्हते. दोघांची नजरा-नजर झाली नि तू म्हटलास चाल मस्त गरम कॉफ्फी पिऊन येऊ.... कुठेतरी लांब जाऊ....
तू गाडी काढलीस..... गाडी चालवताना मी हळूच डोके तुझ्या पाठीवर ठेवले.... मी म्हटले, “भिजलास की रे पूर्ण... आता...? ” “ आणि तू सुद्धा....” , तू म्हणलास. आपण पावसात फिरू लागलो.... coffeeshop शोधत.... आणि जवळच्याच टपरीवरून कुडकुडत गरमागरम coffee मागवली. संपूर्ण भिजलेले असताना वाफाळलेल्या coffee ने तरतरी आणली. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता..... आणि आता तो थांबावा असं आपल्या दोघांनाही वाटत नव्हते.... आपण चौपाटीवर आलो. समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा किनाऱ्यावर येऊन धडकत होत्या जोरात... जणू पाऊस आल्याचा आनंदच व्यक्त करत होत्या... आजूबाजूला कोणीच नव्हते... तुझ्यासारखेच कोणी ‘ तिच्या ’ साठी पावसात आलेले.... त्या समुद्राला बघून मी पण बेभान होऊन पावसात चिंब भिजत होते, हात पसरून प्रत्येक थेंब अंगावर घेत होते... तू माझा वेडेपणा तुझ्या डोळ्यात साठवत होतास... आणि अचानक मला मिठी मारलीस... नि मी शांत झाले तुझ्या कुशीत.. सर्व सर्व काही विसरले...
इतक्यात टकटक झाली दरवाज्यावर.... मी दरवाजा उघडला. माझी रूममेट प्रियांका आली होती, चहा प्यायला चल म्हणाली. मी स्वप्नांच्या दुनियेतून अलगद खाली आले. मी मनाशीच हसले नि प्रियांकाने एक संशयी आक्षेप माझ्यावर टाकला. आम्ही दोघी खाली चहा प्यायला गेलो.

Comments
Post a Comment