सूर तू माझा...

सावलीपरी भास तुझा, जीव नादावतो पुन्हा..
माझ्यामध्येच शोधते मी तुझ्या पाऊलखुणा..

रंगीबेरंगी छटा बघून माझ्या मी हरखू लागलेय..
तुझ्याच सरींमध्ये मन गाभारा प्रेमाने भिजवू लागलेय..

तुझ्या कोशात गुरफटलेली मी खडबडून जागी झालेय..
अन “ माझ्यातल्याच मला ” मी नव्याने भेटू लागलेय..

आनंद तुझा नि हसू माझे, मायेच्या पावसाने तू मला भिजवावे..
सूर तुझा नि शब्द माझे, तुझ्या चालीवर मला माझे जीवनगाणे सुचावे..

मी तयार आहे तुझ्याबरोबर खूप खूप चालायला..
पण मी थकल्यावर मात्र तू यायला हवेस आधार दयायला..

साचेबद्ध जगता जगता, मोकळा श्वास घ्यायचं विसरलेली मी..
तुझ्या मिठीतच शांत झालेय....
माझ्याकडे दयायला तुंला काहीच नाही, जे क्षण जगायचे तेच ठेवलेत उधार तुझ्यादारी मी...
मला फक्त तुझ्या प्रवाहाबरोबर वाहतच जायचं आहे.. वाहतच जायचं आहे....




Comments

Popular posts from this blog

तुझं माझं जमेना नि तुझ्यावाचून करमेना....

तूच तू...

प्रेमरंग तुझा बावरा....!