"विखुरलेले रंग.."
आठवणींचे दिवस, सरतील कसे...!
काळजावर उमटलेत, त्यांचे काटेरी ठसे...!!
काळजावर उमटलेत, त्यांचे काटेरी ठसे...!!
रात्र अंधारी दुःखाची, अश्रूंचा पाऊस घेऊन येते...!
हिम्मत किती तुझ्यात, तुझ्या प्रत्येक श्वासात जाणवते...!!
हिम्मत किती तुझ्यात, तुझ्या प्रत्येक श्वासात जाणवते...!!
वेड केलयस पुरते तुझ्यात, झोपेतही आता तुझेच नाव गुणगुणते..!
निरुत्तर मी स्वतःला सावरत डोळयांतला पाझर अडवते...!!
निरुत्तर मी स्वतःला सावरत डोळयांतला पाझर अडवते...!!
ते दिवसही हसतात आताश्या मला बघून..!
पण आता घातलीय मनाची समजून मी आणि एकट्याने राहायची सवयही स्वतःहून..!!
पण आता घातलीय मनाची समजून मी आणि एकट्याने राहायची सवयही स्वतःहून..!!
तुझ्याविना रिते मन माझे, रेशमी गंध केव्हाच उडून गेलेले...!
माझे क्षितिज तुझ्या थेंबांनी भिजलेले, ढग तुझ्या रंगांविना विखुरलेले...!!
माझे क्षितिज तुझ्या थेंबांनी भिजलेले, ढग तुझ्या रंगांविना विखुरलेले...!!
नकोच काही मला आता, ना हव्यास काही..!
पडून रहावे ते मृत शरीर, मी फक्त एक निश्चल दगड राही...!!
पडून रहावे ते मृत शरीर, मी फक्त एक निश्चल दगड राही...!!
काळ जाईल सरसर, दिवसही निघून जातील आपोआप, आता नसे मनी तृष्णा..!
निदान याजन्मी नाही...
पण पुढच्या जन्मी होईन मी तुझी कृष्णा..!!
निदान याजन्मी नाही...
पण पुढच्या जन्मी होईन मी तुझी कृष्णा..!!
Comments
Post a Comment