जिद्दीचा canvas..!
दुर्दम्य इच्छाशक्ती, त्याबरोबरच अथक परिश्रमांची जोड आणि अपेक्षा न करता फक्त प्रामाणिकपणे कष्ट करत राहणे..याचे दुसरे नाव म्हणजेच अमित..! अजूनही आपल्याकडे इंजीनीर्स-डॉक्टर, वकील अश्याच गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाते तेच मुलगा कलाक्षेत्रातला असेल तर नातेवाईक आणि बाहेरील मंडळींकडूनही सतत विचारणा होता राहते..अजून काही कमावत नाही वाटते..! पण या सगळ्या प्रश्नांना आणि लोकांना बाजूला सारत त्याने स्वतःच्या हट्टावर १० वी नंतर admission घेतले पुण्याच्या अभिनव कलामंदिरात..! Gd Art painting diploma या अभ्यासक्रमाला..! वाईजवळील फुलेनगरसारख्या छोट्याश्या गावातून असा बाहेर पडलेला हा एकटाच मुलगा..! त्याच्या drawingच्या प्रेमाने भारावलेला.. वेडा झालेलाच म्हणा ना.. घरातली परिस्थिती तशी बेताची पण तरीही हा मुलगा आपल्या निर्णयावर ठाम होता. वयाच्या १०व्य वर्षीच आपल्याला याच क्षेत्रात उतरायचे आहे हे त्याने ठरवले होते.
foundation आणि interadvance diploma असा ५ वर्षांचा कोर्स पूर्ण करत असतानाच शेवटच्या वर्षी मुंबईच्या जहांगीर आर्ट galaryला स्वतःच्या चित्रांचे प्रदर्शन मांडण्याची संधी मिळाली. हळूहळू पण बर्याच नवीन गोष्टी शिकत अमित एका पाठोपाठ एक शिखरे पादाक्रांत करत निघाला होता. पण त्याला आंतरराष्ट्रीय कॅन्वासवर आपलं कुंचला उमटवायचा होता. यांनतर अमित मध्यप्रदेशातील भोपाळ येथील international स्टुडीओमध्ये गेला. “print-making” या चित्राप्रकारातील विविध कौशल्ये त्यांनी आत्मसात केली. भोपाळच्या अनुभवाबद्दल बोलताना अमित म्हणतो कि, यामुळे माझा artistic painting चा दृष्टीकोन बदलला आणि तो आणखीनच व्यापक झाला.
कमर्शियल आर्टस आणि advertising मध्ये न रमणारा, काहीसा बिनधास्त अमित म्हणतो, "कोणत्याही बंधनांमध्ये न अडकता आर्टिस्टला रंग, रूप, आकार, रेषा आणि विविध माध्यमांच्या वापर करून बिनधास्तपणे व्यक्त होता आले पाहिजे. स्वतःशी एकरूप व्हा. एकरूप झाल्यानंतर तुमच्यातील creative गोष्टी समजतील. त्यानंतर तुमच्या paintingची स्वनिर्मिती होईल. तेव्हा रंग तुमचे असतील, आकार तुमचे असतील, रेषा तुमच्या असतील. Painting हे फक्त canvas वर होत नाही तर ते तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत आहे.! "

Comments
Post a Comment