Posts

Showing posts from 2016

तूच तू...

Image
"तूच तू..." सुखाचा "स्पर्श" तू.. माझा गुंतलेला श्वास तू.. आयुष्य रंगवून टाकणारा अनामिक रंग तू.. मी अंतर्मनात जपलेला षड्ज तू.. मला विरघळवून टाकणारा माझा शिंपला तू.. माझ्या प्रत्येक श्वासात झिरपणारा थेंब तू..   कोणती जादू ही, माझे मलाच उमजेना..! आणि माझ्यात माझ्यापेक्षा जास्त होणारा तू.. तुझा गंध माझा, तुझा रंग माझा, स्पर्श माझा... श्वासही तू माझाच, ती धुंद मिठी ही माझीच... माझे म्हणायला माझे आहे तरी काय.. मी सर्वस्वी तुझीच..!!

बकुळफुलांची शपथ...

Image
'तो' आल्यावर मी सगळ्या ढगांना तुझं नाव विचारते अन् सगळ्या विजांशी तुझ्यासाठीच भांडत राहते दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत हेलकावणाऱ्या ओंडक्यासारखी मी अन् पहाडावर उगवत्या सूर्यासारखा तू, आणि आता तर आपण एकमेकांचे कोणीच नसतानाही, 'तो' आहेच, जो पूर्वी आपल्यात होता... आपला पाऊस.! तू मला दिलेल्या बकुळीच्या फुलांची शपथ, मी फुलांचा गंध आणि तुझ्या पहिल्या स्पर्शाचा ओला सुंगंधही अजून काळजात जपून ठेवला आहे.. ते घरट्याकडे परतणारे पक्षी, तो मावळतीचा सूर्य सारे रोज मला तुझ्याबद्दल विचारतात.. आता तुझ्याशिवाय संध्याकाळ........... मग अचानक शब्दांचे अश्रू ओघळतात गालांवरून.. मी एकटीच कॉफीचे घोट घेत गॅलरीत उभी असते...... पण यापुढच्या संध्याकाळी सोबत जगता येणार नाही हे समजायला वेळ लागतोय मला... तू पावसाच्या बरसण्याचं आणि माझ्या रडण्याचं कारण नको विचारुस.. तू पावसाच्या वाहण्याला अन् माझ्या रीतं होत जाण्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर जमल्यास.. मी डोळे पुसते माझे अन खिडकीतून त्याला पाहत राहते.. तुझ्या बोटांचे ठसे उमटलेल्या तुझ्या आवडत्या पुस्तकाला मी मग कुरवाळत बसते...

सूर तू माझा...

Image
सावलीपरी भास तुझा, जीव नादावतो पुन्हा.. माझ्यामध्येच शोधते मी तुझ्या पाऊलखुणा.. रंगीबेरंगी छटा बघून माझ्या मी हरखू लागलेय.. तुझ्याच सरींमध्ये मन गाभारा प्रेमाने भिजवू लागलेय.. तुझ्या कोशात गुरफटलेली मी खडबडून जागी झालेय.. अन “ माझ्यातल्याच मला ” मी नव्याने भेटू लागलेय.. आनंद तुझा नि हसू माझे, मायेच्या पावसाने तू मला भिजवावे.. सूर तुझा नि शब्द माझे, तुझ्या चालीवर मला माझे जीवनगाणे सुचावे.. मी तयार आहे तुझ्याबरोबर खूप खूप चालायला.. पण मी थकल्यावर मात्र तू यायला हवेस आधार दयायला.. साचेबद्ध जगता जगता, मोकळा श्वास घ्यायचं विसरलेली मी.. तुझ्या मिठीतच शांत झालेय.... माझ्याकडे दयायला तुंला काहीच नाही, जे क्षण जगायचे तेच ठेवलेत उधार तुझ्यादारी मी... मला फक्त तुझ्या प्रवाहाबरोबर वाहतच जायचं आहे.. वाहतच जायचं आहे....

"विखुरलेले रंग.."

Image
आठवणींचे दिवस, सरतील कसे...! काळजावर उमटलेत, त्यांचे काटेरी ठसे...!! रात्र अंधारी दुःखाची, अश्रूंचा पाऊस घेऊन येते...! हिम्मत किती तुझ्यात, तुझ्या प्रत्येक श्वासात जाणवते...!! वेड केलयस पुरते तुझ्यात, झोपेतही आता तुझेच नाव गुणगुणते..! निरुत्तर मी स्वतःला सावरत डोळयांतला पाझर अडवते...!! ते दिवसही हसतात आताश्या मला बघून..! पण आता घातलीय मनाची समजून मी आणि एकट्याने राहायची सवयही स्वतःहून..!! तुझ्याविना रिते मन माझे, रेशमी गंध केव्हाच उडून गेलेले...! माझे क्षितिज तुझ्या थेंबांनी भिजलेले, ढग तुझ्या रंगांविना विखुरलेले...!! नकोच काही मला आता, ना हव्यास काही..! पडून रहावे ते मृत शरीर, मी फक्त एक निश्चल दगड राही...!! काळ जाईल सरसर, दिवसही निघून जातील आपोआप, आता नसे मनी तृष्णा..! निदान याजन्मी नाही... पण पुढच्या जन्मी होईन मी तुझी कृष्णा..!!

जिद्दीचा canvas..!

Image
                  दुर्दम्य इच्छाशक्ती, त्याबरोबरच अथक परिश्रमांची जोड आणि अपेक्षा न करता फक्त प्रामाणिकपणे कष्ट करत राहणे..याचे दुसरे नाव म्हणजेच अमित..! अजूनही आपल्याकडे इंजीनीर्स-डॉक्टर, वकील अश्याच गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाते तेच मुलगा कलाक्षेत्रातला असेल तर नातेवाईक आणि बाहेरील मंडळींकडूनही सतत विचारणा होता राहते..अजून काही कमावत नाही वाटते..! पण या सगळ्या प्रश्नांना आणि लोकांना बाजूला सारत त्याने स्वतःच्या हट्टावर १० वी नंतर admission घेतले पुण्याच्या अभिनव कलामंदिरात..! Gd Art painting diploma या अभ्यासक्रमाला..! वाईजवळील फुलेनगरसारख्या छोट्याश्या गावातून असा बाहेर पडलेला हा एकटाच मुलगा..! त्याच्या drawingच्या प्रेमाने भारावलेला.. वेडा झालेलाच म्हणा ना.. घरातली परिस्थिती तशी बेताची पण तरीही हा मुलगा आपल्या निर्णयावर ठाम होता. वयाच्या १०व्य वर्षीच आपल्याला याच क्षेत्रात उतरायचे आहे हे त्याने ठरवले होते.                   foundation आणि interadvance diploma असा ५ वर्षांचा कोर्स पूर्ण...