भास तुझा..
स्वप्नातही तुझी वाट पाहाते, तुझ्या कुशीतच मला मी सापडते...
डोळे उघडून चोहीकडे वेडी मी तुलाच शोधते...
तुझ्याविन काहूर हे उरी दाटते, माझ्या डोळ्यातल्या 'तुला' मी लपवते...
तुझ्यातच विरघळते, तुझ्यातच हरते-विरते,
तुझ्यातच भिजते, बेभान होऊन तुझ्याबरोबरच नाचते...
तुझेच नाव गुणगुणते, तुझ्या आठवांनी शहारते, एकटीच सावरते...
मन का हे तुलाच नादावते आणी वेडी मी माझी मलाच हसते...
मखमली भास हे सारे तुझे सभोवताली.. वेडी चाहूलही तुझीच..
पाऊल हे तुझ्याकडेच रेंगाळते, श्वास हा गंधाळतो...
विसरून मी माझी मला, मी तुझीच होऊन जाते...
किती छळतोस मला, तोल माझा सावरु मी कसा..
मन हळवे भांबावते...! सांग मी होते तुझी का...!!
Comments
Post a Comment