“ त्यांच्या कुशीतली गोष्ट.... ”
"अगं आई, दे ना लवकर, माझी फाईल.. मला कॉलेजला जायला उशीर होतोय.." पायात शूज असल्यामुळे मी आईला खूपच घाईमध्ये सांगत होते. संध्याकाळी कॉलेजमधून घरी आल्यावर माझ्या आत्याने मला जवळ बोलावले. माझे आवरून झाल्यावर ती मला ओरडली नि म्हणाली, "आज तुझे आजोबा असते म्हणजे तुला वेळेचे महत्व समजले असते. तुझे आजोबा अतिशय शिस्तबद्ध होते. एकदा असच झालं. तुझ्या सुधीर काकाने शाळेमध्ये NCC चा ड्रेस वेळेत दिला नसल्यामुळे शिक्षकांनी आजोबांना सांगितले. तेव्हा आजोबांनी त्याला मस्त चोप दिला होता.
माझे आजोबा अतिशय शिस्तप्रिय आणि मानी होते त्यांना खोट्याची, दंभाची नि कोरडया फुशारकीची त्यांना मनस्वी चीड. आजोबा म्हणजे मध्यम उंची, उत्तम आणि पिळदार शरीरयष्टी, पाणीदार डोळे, डोक्यावर सफाईदारपणे बांधलेला फेटा, पांढरेशुभ्र धोतर, नेहरू-शर्ट! त्यांचा दरारा फार मोठा! कुण्या ऐर्यागैर्याची हिम्मत नाही होणार पुढे बोलण्याची !घरातल्यांबरोबरच इतर लोकांना देखील त्यांच्याविषयी आदर वाटायचा. त्यांच्या लहानपणी परिस्थिती खूपच हलाखीची होती.पण ते घडले ते स्वकर्तुत्वावर आणि करारीपणावर.ते जसे शरीराने भरभक्कम होते तसे मनाने लवचिकदेखील! वेळप्रसंगी त्यांनी गवंडयाच्या हाताखाली काम केले, वयाच्या १२ व्या वर्षी हॉटेलमध्ये टेबल पुसणाऱ्या नि कप-बशी धुणार्या या सर्वसामान्य मुलाने स्वजिद्दीने स्वतःचे हॉटेल उभारले.हा जीवनप्रवास बघितल्यावर शून्यातून राज्य निर्माण करणे म्हणजे काय या उक्तीची जाणीव होते. १९५५पासून त्यांनी वाई अर्बन बँकेचे डायरेक्टर पद सांभाळले.हॉटेलचा व्यवसाय असल्यामुळे कोणी मुलगा जाताना दिसला कि,त्याला ते हाक मारून बोलावत आणि हातात खाऊ देत सांगत - “ उद्या सकाळी व्यायामशाळेत ये.”
त्यांचे व्यायामावर अतिशय प्रभुत्व होते. व्यायाम त्यांच्या नसानसात भिनलेला! ते म्हणजे एक पोलादीपुरुषच होते! त्यांचा स्वभावदेखील बाणेदार! त्यांना व्यायामशाळेकडून अनेक पारितोषिके मिळाली. त्यांच्या लवचिकतेचे दर्शन घडविणारे फोटो बघितले, शरीराचा तोल सांभाळण्याचे कौशल्य यांसारखे त्यांचे फोटो बघितल्यावर एक प्रकारची स्फूर्ती आपल्याला मिळते. वयाच्या ६९व्या वर्षी त्यांनी काढलेले २६०० जोर हा नवा जोर संकल्पच होता.
व्यायामाबरोबरच त्यांना इतरही अनेक छंद होते. वाचन हा त्यांचा आवडता छंद. राजा शिवछत्रपती, श्रीमान योगी,स्वामी कादंबरी हि ऐतिहासिक पुस्तके, दासबोध,तुकाराम गाथा,भगवद्गीता यांसारखे ग्रंथ ते आवडीने वाचायचे. संस्कृत भगवद्गीता त्यांना अतिशय प्रिय! असे लेखन-साहित्य मुलांनीदेखील वाचले पाहिजे, यांवर त्यांचा भर होता.मुलांच्या शिक्षणाबाबतीत ते अतिशय कडक होतेच, पण स्वतःसाठीदेखील ते शिक्षण घेत. परिस्थितीमुळे त्यांना शिकता आले नाही. त्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी शिक्षक घरी येत.
म्हणतात ना, ‘विद्व्तेच्या अंगावरती देशभक्ती खेळते!’
आजोबा सामाजकार्याकडेदेखील वळले. सारा हिंदू समजा एकात्म व्हावा, या जाणीवेतून तात्या नित्सुरे वाईच्या घाटावर स्पृश्यास्पृश्य बंधू-भगिनिंसमवेत काम करत. वाईची हिंदुत्वनिष्ठ मंडळी त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदुमहासभा यांसारख्या संघटनांमधून काम करत. या हिंदुत्वनिष्ठ मंडळींमध्ये माझे आजोबा उल्लेखनीय आहेत. वाईच्या घाटावरील कृष्णाबाई उत्सव असो,अथवा दुसरा कोणताही कार्यक्रम असो,कोणत्या संस्थेला देणगी दयायची असो, आजोबा त्यामध्ये सर्वांत पुढे! इतरांना दान देण्याचा त्यांचा सद्गुण मला अतिशय आवडतो.कुणाची कोणतीही अडचण असो, ती ते लगेच दूर करणार.
मुत्सद्दी, कलेचे भोक्ते,शिक्षणाविषयी आस्था असलेले असे माझे आजोबा १९९१ साली काळाने ओढून नेले. जो सर्वांना आवडतो, तो देवाला देखील आवडतो ना! एखादा वटवृक्ष ज्याप्रमाणे निसर्गक्रमानुसार ढासळून कालवश व्हावा; त्याप्रमाणेच माझे आजोबा............ नियतीला माझी आणि आजोबांची गाठ मान्य नव्हती. आई ने रागावल्यावर जवळ घेऊन प्रेमाने समजावणारे, हट्ट पुरवणारी हक्काची व्यक्ती ती आजोबा! आणि रात्री झोपताना त्यांच्या कुशीतली गोष्ट यापेक्षा स्वर्गसुख ते वेगळे काय असते! मी या गोष्टींचा आनंद नाही घेऊ शकले पण एक मात्र खरं, मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो.
संत रामदास म्हणतात – ‘देहे त्यागिता कीर्ती मागे उरावीI’ त्याप्रमाणे त्यांनी चंदनासारखे स्वतः झिजून इतरांना सुवास दिला. मला आजोबा नसल्यामुळे त्यांचे प्रेम मिळाले नाही. पण काहींना ते असूनही त्यांचे प्रेम मिळत नाही. पण सध्याच्या या mummy-dady न च्या युगात आजोबा नि आजी राहिलेच नाहीत. मुलगा परदेशी स्थायिक होतो त्यामुळे त्यांना एकटेच राहावे लागते. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आज अनेक आजोबा वृद्धाश्रमात राहतात. त्यांना आपल्या प्रेमाच्या, मायेच्या हाताची गरज आहे. इवल्या-इवल्या पावलांनी पळत येऊन आपल्याला ‘आजोबा’ अशी हाक मारावं, असं त्यांनादेखील वाटतं. आपल्या छोट्या नातीचे/नातवाचे कौतुक करण्यात त्यांचा खूप सारा आनंद दडलेला असतो. आजोबा म्हणजे संस्कारांचं भांडारच असत. आणि त्यामुळेच आजच्या या युगात आजच्या तरुण पिढीवर संस्कार करणारं कोणीतरी हवय! घरातल्या या चालत्या-बोलत्या संस्काराला सोडून मुले आज पैसे देऊन संस्कारवर्गात जातात. घरातल्या चालत्या-बोलत्या संस्कारवर्गाला वृद्धाश्रमात पाठवतात! हे कोडेच अद्याप मला उलगडलेलं नाही.
देह झिजवून मुलाने शेवटी काय दिले, तर- ‘वृद्धाश्रम’! त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका हो. नातवाबरोबर खेळताना त्यांच्या चेहऱ्यावरील ते निरागस हास्य पुसू नका हो! त्यांना आपल्या आधाराची गरज आहे! आयुष्यभर कष्ट करून जीवनाच्या संध्याकाळी तरी त्यांना आनंदाचे क्षण अनुभवू दया!

Comments
Post a Comment