Posts

Showing posts from 2015

" ओलेचिंब मन माझे..."

Image
वेडा वारा तुझ्या शोधात निघाला, कातर माझा सूर झाला तू नसताना भिजले हे मन पुन्हा, तुझिया आठवांच्या वेदना कवटाळताना... बेहोश वारा मनरंगी झुलताना, जाणता अजाणता तुझ्यात विरघळताना तो थेंब शिंपल्यात लपताना, जणू तू मला घट्ट मिठीत घेताना आभाळी घन दाटताना, बावरी सोनपालवी फुलताना धरतीला 'तो' मिळताना गंध उधळत, ती हळवी दुपार कलताना तुझ्या स्मृतींच्या वेदना चुरचुरताना, तू नसताना तुझ्यासवे भिजताना मेघांच्या रंगात हरवताना, निथळून गेले ते सावळे क्षण अनुभवताना आठवांच्या गर्द रानी झाडांच्या ओठी ओली थरथर, पानांचे थेंब गळून पडताना साऱ्या दिशांना भास हा तुझा, स्मरणांचा पाऊस ओथंबताना, मोहर सारा उतरताना तुझिया स्पर्शांच्या स्मृती झुरताना, रिमझिम तू माझ्यात ओझरताना तोडूनी त्या जबाबदाऱ्यांचे बंधपाश सारे तू ये ना.... तो धुक्याचा पडदा सारून तू ये ना... मी शमणार तुझ्याविण नाही तू ये ना.... माझा सूर उमटणार तुझ्याविण नाही तू ये ना... हिरवी पालवी फुलणार ना तुझ्याविण नाही तू ये ना.... गंध भेटीतला, मूक विरहातला, चहूकडे तुझेच संमोहन या साऱ्या वाटा सुन्या तुझियाविण तू ये ना....

भास तुझा..

Image
स्वप्नातही तुझी वाट पाहाते, तुझ्या कुशीतच मला मी सापडते... डोळे उघडून चोहीकडे वेडी मी तुलाच शोधते... तुझ्याविन काहूर हे उरी दाटते, माझ्या डोळ्यातल्या 'तुला' मी लपवते... तुझ्यातच विरघळते, तुझ्यातच हरते-विरते,  तुझ्यातच भिजते, बेभान होऊन तुझ्याबरोबरच नाचते... तुझेच नाव गुणगुणते, तुझ्या आठवांनी शहारते, एकटीच सावरते... मन का हे तुलाच नादावते आणी वेडी मी माझी मलाच हसते... मखमली भास हे सारे तुझे सभोवताली.. वेडी चाहूलही तुझीच.. पाऊल हे तुझ्याकडेच रेंगाळते, श्वास हा गंधाळतो... विसरून मी माझी मला, मी तुझीच होऊन जाते... किती छळतोस मला, तोल माझा सावरु मी कसा.. मन हळवे भांबावते...! सांग मी होते तुझी का...!!

आठवणींचा शिंपला

Image

गणेशोत्सवाचे बदलते रूप....

Image
               कॉलेज मधून नेहमीप्रमाणेच संध्याकाळी रूमवर आले. चहा टाकणार इतक्यात बेल वाजली. “वर्गणीसाठी आलोय, तुम्ही किती लोक राहता, आम्ही प्रत्येकी १००/- रु घेतो आणि हे विद्यार्थ्यांसाठी देखील कम्पलसरी आहे.” अरे काय हि भाषा! वर्गणी गोळा करता कि हफ्ता. जबरदस्ती आहे काय.!! टिळकांनी सुरु गेलेल्या गणेशोत्सवात सांगितले नव्हते जबरदस्तीने पैसे गोळा करा म्हणून. आणि ते हि अश्या पद्धतीने.! वर्गणी असतेच मनापासून आपण भक्तिभावाने दिलेली देणगी. gos वर चहा जोरोरात खळखळत होता नि मी विचारचक्रात डुंबत होते.                गणेशोत्सव..!!! लहानापासून थोरांपर्यंत आनंद पर्वणी! या दिवसात पुण्याचे पूर्ण रुपडं पालटून जाते. पेठांमधले वातावरणच वेगळे असते. ढोल दणाणू लागतात.. मंडप, डेकोरेशन, सजावट या विषयांनी मित्रांचे कट्टे रात्ररात्रभर जागू लागतात.. तरुणाईचा भन्नाट उत्साह नि सळसळता जोश बघायला मिळतो तो याच दिवसात..! वेध असतात ते गणेशोत्सवाचे.. त्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे.. तो बाप्पाच घेऊन येतो तो नवा जोश नि नवा उत्साह...

“ त्यांच्या कुशीतली गोष्ट.... ”

Image
             "अगं आई, दे ना लवकर, माझी फाईल.. मला कॉलेजला जायला उशीर होतोय.." पायात शूज असल्यामुळे मी आईला खूपच घाईमध्ये सांगत होते. संध्याकाळी कॉलेजमधून घरी आल्यावर माझ्या आत्याने मला जवळ बोलावले. माझे आवरून झाल्यावर ती मला ओरडली नि म्हणाली, "आज तुझे आजोबा असते म्हणजे तुला वेळेचे महत्व समजले असते. तुझे आजोबा अतिशय शिस्तबद्ध होते. एकदा असच झालं. तुझ्या सुधीर काकाने शाळेमध्ये NCC चा ड्रेस वेळेत दिला नसल्यामुळे शिक्षकांनी आजोबांना सांगितले. तेव्हा आजोबांनी त्याला मस्त चोप दिला होता.               माझे आजोबा अतिशय शिस्तप्रिय आणि मानी होते त्यांना खोट्याची, दंभाची नि कोरडया फुशारकीची त्यांना मनस्वी चीड. आजोबा म्हणजे मध्यम उंची, उत्तम आणि पिळदार शरीरयष्टी, पाणीदार डोळे, डोक्यावर सफाईदारपणे बांधलेला फेटा, पांढरेशुभ्र धोतर, नेहरू-शर्ट! त्यांचा दरारा फार मोठा! कुण्या ऐर्यागैर्याची हिम्मत नाही होणार पुढे बोलण्याची !घरातल्यांबरोबरच इतर लोकांना देखील त्यांच्याविषयी आदर वाटायचा. त्यांच्या लहानपणी परिस्थिती खूपच हलाखीची होती.पण त...

प्रेमरंग तुझा बावरा....!

Image
            पहिल्यांदा कधी भेटला, कसा भेटला,नाहीच आठवत..! कधी त्याची ओढ लागली मनाला.. कोणता होता तो दिवस. हेही नाहीच आठवत..! मोठं होता होता त्याच्यासोबत आपली किती स्वप्नं मोठी झाली, किती इच्छा तरुण झाल्या... आठवू म्हटलं तरी नाहीच आठवत !            मग तरी का येतो आजही त्याच्या आठवणींचा वेडावणारा गंध.? जरा आत उकरल, कि मनाची माती आजही तशीच गंधभारली भासते. त्याचं असं नुस्त नाव जरी काढलं तरी मनात कधीकधी रिमझिमायला लागतो आनंद..! आणि कधी उगाच दाटून येतं मळभ.... कधी रुणझुणतात सुखाच्या तारा आणि कधी मात्र जीव कासावीस होत डोळ्याला लागतात धारा...            काल अचानकच तुझी खूप आठवण आली. राह्वेनासे झाले.. अस्वस्थता मनाला शांत बसू देईना. आणि कसंबसं धैर्य एकवटून नंबर आठवून फोन लावला तुला. प्रेम.... एक सुंदर, मनाला वेड लावणारी, स्वप्नातील गोष्टी सत्यात उतरवणारी भावना, जवळच्या व्यक्तीची ती प्रचंड ओढ. एक सुंदरसं, नाजुकसं, अवखळ फुलपाखरू ! स्वच्छंदी उडणारं, मनाला वाटेल तिथे घेऊन जाणारं... फोन उचलताच तुझा उत्तरासम प्...