“ त्यांच्या कुशीतली गोष्ट.... ”

"अगं आई, दे ना लवकर, माझी फाईल.. मला कॉलेजला जायला उशीर होतोय.." पायात शूज असल्यामुळे मी आईला खूपच घाईमध्ये सांगत होते. संध्याकाळी कॉलेजमधून घरी आल्यावर माझ्या आत्याने मला जवळ बोलावले. माझे आवरून झाल्यावर ती मला ओरडली नि म्हणाली, "आज तुझे आजोबा असते म्हणजे तुला वेळेचे महत्व समजले असते. तुझे आजोबा अतिशय शिस्तबद्ध होते. एकदा असच झालं. तुझ्या सुधीर काकाने शाळेमध्ये NCC चा ड्रेस वेळेत दिला नसल्यामुळे शिक्षकांनी आजोबांना सांगितले. तेव्हा आजोबांनी त्याला मस्त चोप दिला होता. माझे आजोबा अतिशय शिस्तप्रिय आणि मानी होते त्यांना खोट्याची, दंभाची नि कोरडया फुशारकीची त्यांना मनस्वी चीड. आजोबा म्हणजे मध्यम उंची, उत्तम आणि पिळदार शरीरयष्टी, पाणीदार डोळे, डोक्यावर सफाईदारपणे बांधलेला फेटा, पांढरेशुभ्र धोतर, नेहरू-शर्ट! त्यांचा दरारा फार मोठा! कुण्या ऐर्यागैर्याची हिम्मत नाही होणार पुढे बोलण्याची !घरातल्यांबरोबरच इतर लोकांना देखील त्यांच्याविषयी आदर वाटायचा. त्यांच्या लहानपणी परिस्थिती खूपच हलाखीची होती.पण त...