Posts

Showing posts from December, 2014

नात्यातला झगडगुंता.... (Emotional Complications)

Image
             रूमवर आल्यावर बघितले तर प्रियाचा चेहरा काहीसा उदास होता. मला बघितल्यावर तर तिला रडूच कोसळले. काय झाले विचारले तर तिने मला तिच्या bf चा मेल दाखवला. ब्रेकअप म्हणून... खूप समजावल्यावर तिचे रडणे कसे-बसे थांबले. कॉलेजचे ते मस्त स्वच्छंदी बागडण्याचे दिवस ! ते वेडे वय असतेच तसे. कधी आखोही-आखोंमे इशारा होतो नि केळ्याच्या सालावरून घसरून पडावे तसे आम्ही प्रेमात पडतो. कॉलेजातल्या ' केमिस्ट्रीच्या लेक्चरला वेगळीच केमिस्ट्री जमू लागते. ' अजिब दास्ता है ये....' असं म्हणता म्हणता ती अजिब वाटणारी दास्ता नकळतच कधी आपली होऊन जाते हे समजतच नाही. मग काय हवायेन चलने लगती है,अगदी स्लो मोशन मध्ये दुपट्टा सुधा उडायला लागतो बर का ! रात्र-रात्र जागून एकमेकांशी तासनतास फोनवर बोलणे सुरु होत.. बाईकवरून सुसाट लॉंग-ड्राईव्ह होतात... भर थंडीत आईस्क्रीम खाण्यात मज्जा यायला लागते.. हॉटेलात गेल्यावर, " सांग ना, तुला आवडेल ते मला ' काहीही ' चालेल " असं म्हणत मेन्यू ठरवण्यात अर्धा-अर्धा तास जायला लागतो.. त्यावरून लटकी भांडण, रुसवेफुगवेही सुरु होतात..       ...

अविस्मरणीय अनुभव...

Image
                           साधारण डिसेंबरचा महिना होता. सगळीकडेच डेज् आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे वारे वाहू लागले होते. याच सुगीच्या काळात कॉलेजचे नोटीस बोर्ड सहलींच्या नोटीसने भरले होते. आमच्या होस्टेल मध्ये सुद्धा ' होस्टेल डे ' दिमाखात पार पडला. आणि या सगळ्याचा विपर्यास म्हणून की काय त्याची हवा आमच्यापण डोक्यात गेली नि आम्ही एक अर्जेंट मीटिंग भरवली आमच्या ग्रुपची..!!आमच्या रूममध्ये मी एकटीच लहान बाकी सगळे शेवटच्या वर्षाला त्यामुळे पिकनिक तर करायची हे कन्फर्म होते. जवळ-जवळ दीड ते दोन तास चाललेल्या त्या मीटिंगचा परामर्श म्हणून की काय शेवटी महाबळेश्वर हे ठिकाण पक्के झाले. सगळे एवढे सेरीअस कधी परीक्षेला पण झाले नसतील.! माझ्या घरी वाई मध्ये नि महाबळेश्वरला काकांकडे सर्वांचा मुक्काम ठरला.                        पण काहीजणांना अजूनही वाटत होते की मुंबई-मरीन ड्राईव्ह हे ठिकाण पक्के करावे नि जीवाची मुंबई करून यावी.! शेवटी खूप विचार आणि चर्चेअंती सुवर्णमध्य काढून...