जिद्दीचा canvas..!

दुर्दम्य इच्छाशक्ती, त्याबरोबरच अथक परिश्रमांची जोड आणि अपेक्षा न करता फक्त प्रामाणिकपणे कष्ट करत राहणे..याचे दुसरे नाव म्हणजेच अमित..! अजूनही आपल्याकडे इंजीनीर्स-डॉक्टर, वकील अश्याच गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाते तेच मुलगा कलाक्षेत्रातला असेल तर नातेवाईक आणि बाहेरील मंडळींकडूनही सतत विचारणा होता राहते..अजून काही कमावत नाही वाटते..! पण या सगळ्या प्रश्नांना आणि लोकांना बाजूला सारत त्याने स्वतःच्या हट्टावर १० वी नंतर admission घेतले पुण्याच्या अभिनव कलामंदिरात..! Gd Art painting diploma या अभ्यासक्रमाला..! वाईजवळील फुलेनगरसारख्या छोट्याश्या गावातून असा बाहेर पडलेला हा एकटाच मुलगा..! त्याच्या drawingच्या प्रेमाने भारावलेला.. वेडा झालेलाच म्हणा ना.. घरातली परिस्थिती तशी बेताची पण तरीही हा मुलगा आपल्या निर्णयावर ठाम होता. वयाच्या १०व्य वर्षीच आपल्याला याच क्षेत्रात उतरायचे आहे हे त्याने ठरवले होते. foundation आणि interadvance diploma असा ५ वर्षांचा कोर्स पूर्ण...