Posts

Showing posts from September, 2015

गणेशोत्सवाचे बदलते रूप....

Image
               कॉलेज मधून नेहमीप्रमाणेच संध्याकाळी रूमवर आले. चहा टाकणार इतक्यात बेल वाजली. “वर्गणीसाठी आलोय, तुम्ही किती लोक राहता, आम्ही प्रत्येकी १००/- रु घेतो आणि हे विद्यार्थ्यांसाठी देखील कम्पलसरी आहे.” अरे काय हि भाषा! वर्गणी गोळा करता कि हफ्ता. जबरदस्ती आहे काय.!! टिळकांनी सुरु गेलेल्या गणेशोत्सवात सांगितले नव्हते जबरदस्तीने पैसे गोळा करा म्हणून. आणि ते हि अश्या पद्धतीने.! वर्गणी असतेच मनापासून आपण भक्तिभावाने दिलेली देणगी. gos वर चहा जोरोरात खळखळत होता नि मी विचारचक्रात डुंबत होते.                गणेशोत्सव..!!! लहानापासून थोरांपर्यंत आनंद पर्वणी! या दिवसात पुण्याचे पूर्ण रुपडं पालटून जाते. पेठांमधले वातावरणच वेगळे असते. ढोल दणाणू लागतात.. मंडप, डेकोरेशन, सजावट या विषयांनी मित्रांचे कट्टे रात्ररात्रभर जागू लागतात.. तरुणाईचा भन्नाट उत्साह नि सळसळता जोश बघायला मिळतो तो याच दिवसात..! वेध असतात ते गणेशोत्सवाचे.. त्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे.. तो बाप्पाच घेऊन येतो तो नवा जोश नि नवा उत्साह...