तुझं माझं जमेना नि तुझ्यावाचून करमेना....

सायंकाळचे चार वाजले होते. रेडीओवरती गाणी ऐकत होते मन रमवण्यासाठी. हातात कॉफीचा मग घेऊन खिडकीपाशी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे पाहत बसले होते. रस्त्यावरती बाईकवरून जाणाऱ्या त्या दोघांना बघून मला हेवा वाटला आणि इतक्यात संदीप-सलीलचे "आताश्या असे हे मला काय होते.. कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते...." हे गाणे चालू झाले. परत आठवणींचे मेघ मनावर दाटून आले. इतका वेळ मनात दाबून ठेवलेल्या असंख्य भावना आणि विचारांचे अश्रुरूपी पाणी गालावरून ओघळले. आज रविवार, पण तरीही आज कश्यातच मन रमत न्हवते. दिवसभर मी शांत, बेडवर तशीच पडून होते. मेसेजेस आणि कॉल्सनी mobile खणखणत होता पण कुणाशी बोलण्यातही मला रस वाटत न्हवता. काय होत होते ते मला काहीच काळात न्हवते. आज पूर्ण एक आठवडा होऊन गेला होता. त्याचे नि माझे काही कारणामुळे चांगलेच भांडण झाले होते. ज्यांना एकमेकांशिवाय एक क्षणही करमत नसायचे असे आम्ही दोघे पूर्ण आठवडा एकमे...