TTMM.. तुझं तू .. माझं मी...

celebration करायला काही कारण लागते का..! निमित्त होते मित्राची अविष्कार प्रकल्प स्पर्धेमध्ये निवड झाल्याचे. ' party तो बनती है बॉस ' असं म्हणत सगळ्यांनीच त्याला party मागितली. आमचा कट्टा, हक्काचे नेहमीचे ठिकाण-' ममता '. ममताचा सामोसा आणि दुर्गा मधली कॉफी. आम्ही पंधरा-वीस जण मित्र-मैत्रिणी सगळे. सगळेच batchelor, कॉलेज करणारे विद्यार्थी. त्यामुळे एका मित्रावर सगळ्यांचा खर्च नको म्हणून प्रत्येकाने स्वतःचे पैसे दिले. खूप चं वाटले. सगळे एकत्र जमले आणि त्याच्या आनंदात सहभागी झाले. पण एकट्याला खर्चात पाडायला नको म्हणून स्वतः contribution करून celebration करणारे मित्र-मैत्रिणी ! समजूतदारपणा, समयसूचकता शिकवणारी कॉलेज लाईफ मधली मस्ती. कधी परीक्षा संपली म्हणून तर कधी मित्राने नवीन mobile घेतला म्हणून! किंवा एखाद्या स्पर्धेतल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल केलेली छोटीसी party. मित्राचा वाढदिवस साजरा करायचा असला तरी तिला किंवा त्याला खर्चात टाक...