" ती एक संध्याकाळ..."

आज practical नसल्यामुळे लवकर आले कॉलेजमधून. फ्रेश झाले नि कानात earphone टाकून गाणी ऐकत नेहमीप्रमाणे खिडकीतून त्या पडणाऱ्या पावसाकडे खूप वेळ एकटीच बघत बसले होते. खिडकीतून खाली येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांची, गाडयांची वर्दळ नेहमीचीच. आणि ती बघत बसणे हा माझा आवडता छंद. पण आज मला काहीतरी वेगळे जाणवत होते. पाऊस...!!! आज पाऊस पण होता यासगळ्या बरोबर. प्रत्येकाला भिजवत होता, गुंतवत होता स्वतःमध्ये. पण मी मात्र त्याच्याबरोबर आणखी कुणाशी तरी गुंतत होते. खूप खोल-खोल..... मला ‘त्या’ ची आठवण येत होती. मी खिडकीशी बसलेले.. काहीशी उदास. एखादा मुरलेला कलाकार सतारीवर तारा छेडाव्या तसा एका पाठोपाठ एक, अनेक सरींवर सरी कोसळू लागल्या. mostly पाऊस पडल्यावर मी पेन घेते किंवा मग ब्रश घेऊन कॅन्व्हास कॅलरफुल करायचा असतो मला. पण आज चक्क पावसात चिंब भिजावेसे वाटत होते तुझ्याबरोबर..!! ...